उल्हासनगर शहर उल्हासनदी व वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे.
शहराचे एकुण क्षेत्रफळ १३ चौ.कि.मी. इतके असुन सन २००१ च्या जनगणने नुसार लोकसंख्या ४.७२ लक्ष इतकी आहे. वालधुनी नदी शहराच्या मध्यातून वाहत असून उल्हास नदी महानगरपालिका क्षेत्राच्या उत्तरपूर्व सीमेवरून वाहत आहे.
उल्हासनगर शहर हे मुंबई पासून ५८ कि.मी. अंतरावर असुन मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील एक रेल्वे स्टेशन आहे.
दुस-या महायुध्दाच्या काळात एक ओसाड पडीक जमीन असल्यामुळे येथे कल्याण सैन्य संक्रमण शिबीर (मिलीटरी कॅम्प) म्हणून ओळखले जात असे.
स्वातंत्र्यानंतर झालेल्या विभाजनानंतर ८ ऑगस्ट १९४९ रोजी सी.राजगोपालाचारी,गव्हर्नर जनरल यांचे हस्ते शहराची स्थापना (भूमिपूजन) करण्यात आले.
उल्हासनगर येथे पूर्वी कल्याण सैन्य संक्रमण शिबीर (मिलीटरी कॅम्प) असल्यामुळे आजही बॅरेक्स व ब्लॉक्स मध्ये विभागणी दिसून येते.
१९६१ साली शहराची लोकसंख्या ८०,८६१ इतकी होती,तर १९७१ साली शहराची लोकसंख्या दुप्पट म्हणजे १,६८,४६२ इतकी होती.
उल्हासनगर शहर हे रेशीम,तयार कपडे,इलेक्ट्रिक/इलेक्ट्रोनिक उपकरणे ए.चे उत्पादन केंद्र आहे.
शहरात विद्यमान रस्त्यांची लांबी सुमारे ३५२ किलोमीटर इतकी आहे.
शहराला एमआयडीसीच्या माध्यामातून पाणीपुरवठा केला जातो.
शहरात अग्निशमन सेवा,शैक्षणिक सुविधा,मनोरंजनासाठी पाच सभागृह,नऊ सिनेमाहॉल व एक स्टेडीयम तसेच नऊ सार्वजनिक ग्रंथालये वाचनासाठी उपलब्ध आहेत. |